Nitesh Rane
Nitesh RaneTeam Lokshahi

मला टिल्या म्हणायचं, तुला xxx म्हणू का..? नितेश राणेंची अजित पवारांवर सडकून टीका

म्याऊ, म्याऊ काढला तर तो आईला जाऊन सांगतो. आई मला म्याऊ म्याऊ म्हणतो अशी नक्कल करत आदित्य ठाकरेंची करत टिंगल उडवली.
Published by :
Sagar Pradhan

भूपेश बारंगे। वर्धा: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधारी जोरदार खडाजंगी सुरु असताना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता वर्ध्यातील आर्वीत सरपंच सत्कार सोहळ्यात बोलत असताना आमदार नितेश राणे अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

Nitesh Rane
भाजपमुळे नाही तर 'या' कारणामुळे शिवसेनेत बंडखोरी, गायकवाडांनी खोडले महाजनांचे वक्तव्य

काय म्हणाले नितेश राणे?

तू टिल्या म्हणायचं आणि मी तुला मु म्हणू का अश्या शब्दात त्यांनी आपल्या शैलीतुन टीका केली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघाचे भाजपचे आज नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळासह भाजप पक्षात शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत आदित्य ठाकरे यांची टिंगल उडविली.

मागे त्या आदित्य ठाकरेंला म्हणालो म्याऊ, म्याऊ काढला तर तो आईला जाऊन सांगतो. आई मला म्याऊ म्याऊ म्हणतो अशी नक्कल करत आदित्य ठाकरेंची करत टिंगल उडवली. तर अमोल कोल्हेंवर यावेळी टीकास्त्र सोडले. भाडखाऊ ऍक्टर अमोल कोल्हे आहेय. पैसे घेऊन शिवाजी महाराजांची ऍक्टिग करतो. अशी देखील टीका यावेळी त्यांनी बोलताना केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com