Nitesh Rane | Ajit Pawar
Nitesh Rane | Ajit PawarTeam Lokshahi

"तुमचा आवडता टिल्लु" अजित पवारांच्या टीकेनंतर नितेश राणेंचे जोरदार प्रत्युत्तर

राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात.
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यावरूनच आता आणि आमदार नितेश राणे यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Nitesh Rane | Ajit Pawar
सांगलीच्या भाजप खासदाराची शिंदे गटाच्या आमदारावर सडकून टीका; सत्तेला नमस्कार घालणारे...

काय म्हणाले नितेश राणे?

अजित पवारांच्या टीकेला नितेश राणे यांनी ट्टीटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ते म्हणाले की, गेल्या वेळी बिचारा. एका साध्या शिवसैनिकाने पाडला माझ्या मित्राला. म्हणून ते काही होत का बघा. राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री. मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात. तुमचा आवडता टिललु. असा टोमणा त्यांनी पहिल्या ट्टीट मध्ये मारला.

दुसऱ्या ट्टीटमध्ये ते म्हणाले की, अजित दादा मोठे नेते. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादीच्या scriptwriter मित्रांनी जरा योग्य माहिती “लिहून” दिली पाहिजे. राणे साहेबांबरोबर शिवसेनेतून आलेले सगळे आमदार परत निवडून आले. शाम सावंत सोडून. माहिती असुदे दादा. बस या वेळी माझा मित्र पार्थ ला निवडून आणा. असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.

Nitesh Rane | Ajit Pawar
भाजपकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न; शरद पवारांचे मोठे विधान

काय म्हणाले होते अजित पवार?

एका कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना, असं ते म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com