'अजून कंठ नाही फुटला...' मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानामुळे नितेश राणेंची अदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणुक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरेंच्या या आव्हानामुळे शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरेंना शिंदे गटाने ठाण्यात लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी या आव्हानाला होकार देत पुन्हा चॅलेंज दिले होते. याच आव्हानांवर गदारोळ सुरु असताना आता यावरूनच भाजप आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
आपल्यामुळे कर्तृत्व नाही मग ती आमदारकी काय फक्त मिळवायला हवी का हे मला इथल्या स्थानिक आमदाराला विचारायचे आहे.एक अस्लम शेख पालकमंत्री होते आणि फेसबुक वर सरकार चालत होते. तेव्हा कोळी प्रश्न आल्यावर मिटिंग बंद करतात. आणि तो कोणाला चॅलेंज करतो?? मुख्यमंत्री शिंदे यांना. आता जास्त म्याव म्याव करतो, आधी आपला आवाज सुधार, अजून कंठ नाही फुटला. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
पुढे ते म्हणाले की, कोणाला बोलतो काय बोलतो, असेल हिंमत तर कोकणात ये नाहीतर घरी जा, 2024 मध्ये तुला आम्ही आमदार ठेवणार नाही आणि आमदार शोधायचा कुठे, कारण संध्याकाळी हा त्या दिनू मोरया च्या घरी असतो, मग याला शोधायचा कुठे? पुढच्या वेळी निदान पुरुषी आवाज असलेला आमदार तर देऊ. अशी बोचरी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.