Nitesh Rane | Sanjay Raut
Nitesh Rane | Sanjay Raut Team Lokshahi

एका भटक्या कुत्र्याचा त्रास पूर्ण महाराष्ट्राला होतोय; नितेश राणेंचा राऊतांना अप्रत्यक्ष टोला

राज्य शासन म्हणून नसबंदी किंवा कुठला उपचार करणार आहात का? असा मिश्किल सवाल नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
Published by :
Sagar Pradhan

राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार यांच्या एका विधानामुळे सत्ताधारी पक्ष चांगलाच पाहायला मिळाला. राऊतांच्या त्या विधानामुळे आता त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत आहे. हा सर्व वाद सुरु असताना आज विधानसभेत बोलत असताना नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे.

Nitesh Rane | Sanjay Raut
'रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला'; एसटी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाप्रकरणी अजित पवारांची सरकारवर टीका

काय घडलं नेमकं?

बोरीवली मतदारसंघाच्या आमदार मनीषा चौधरी आज विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील भटक्या कुत्र्यांबाबत बोलत होत्या. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सविस्तर प्रतिसाद दिला. त्यानंतर लगेच नितेश राणे उठून त्यावरच बोलताना प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय 2019 पासून सकाळी 9 वाजता एक भटक्या कुत्र्याचा त्रास पूर्ण महाराष्ट्राला होत आहे. तर यावर राज्य शासन म्हणून नसबंदी किंवा कुठला उपचार करणार आहात का? असा मिश्किल सवाल नितेश राणे यांनी यावेळी उपस्थित केला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेवरून विरोधकांकडून वारंवार टीका केली जाती. त्यावरूनच नितेश राणे यांनी हा टोला राऊतांना लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com