Shivendra Raje Bhosale | Sanjay Raut
Shivendra Raje Bhosale | Sanjay RautTeam Lokshahi

छत्रपती घराण्यावर राऊतांची टीका, शिवेंद्रराजेंचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,...

पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच नुकताच राज्यात दोन ठिकाणी पोटनिवडणुका पार पडला. यावेळी राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. परंतू, वेगवेगळ्या विषयावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरु असताना काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. त्यावरच आता भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना छत्रपती घराण्यार बोलायचा अधिकार नाही. अशा शब्दात त्यांनी राऊतांना सुनावले आहे.

Shivendra Raje Bhosale | Sanjay Raut
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगासोबत झळकले औरंगजेबचे पोस्टर, जलील यांच्या उपोषणातील प्रकार

काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले?

राऊतांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, चेले झाले असं राऊतांनी बोलणं मला तर खरं यावर हसायला येतेय. महाराष्ट्रात कोणीही या वक्तव्याला फार महत्व देत नाही आणि छत्रपतींच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकारच नाही. छत्रपतींच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना फार महत्व देत नाही. असे प्रत्युत्तर शिवेंद्रराजे भोसले यांनी राऊतांच्या टीकेला दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी काल साताऱ्यात बोलत असताना म्हणाले होती की, तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात. त्या घराण्यातील आहात. त्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात, त्या पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अजिबात आदर आणि प्रेम नाही. हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी माजी खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावर नाव न घेता टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com