Ranjeetsingh Naik Nimbalkar
Ranjeetsingh Naik NimbalkarTeam Lokshahi

'शिवसेनानंतर आता राष्ट्रवादीचा क्रमांक' भाजप खासदार रणजीतसिंह निंबाळकरांचे विधान

स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल.

राज्यात आठ महिन्यापूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. परंतु, या बंडखोरीमुळे शिवसेना दोन तुकडे झाले. त्यानंतर या दोन्ही गटाकडून शिवसेना कोणाची हा वाद बराच काळ चालला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. मात्र, सर्वादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना भाजपा खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक विधान केले आहे.

Ranjeetsingh Naik Nimbalkar
न्यायालयात केंद्राचा हस्तक्षेप वाढतोय- अशोक चव्हाण

काय केले निबाळकरांनी विधान?

काही दिवसांपूर्वी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्राच्या पहिल्या भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले गेले होता. त्यासोबत अजित पवार यांचे देखील भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. याच बॅनरबाजीवर भाजपा खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं पाहणारे अनेक मुंगेरीलाल आहेत. स्वप्न पाहणं हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. स्वप्न पाहून शिवसेना संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही. त्याप्रमाणे भविष्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक असेल. असे सूचक विधान त्यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com