Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleTeam Lokshahi

उदयनराजे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्यपालांची तक्रार, हक्कालपट्टी करण्याची मागणी

आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्याचे पडसाद आजही कायम दिसत आहे. अशातच जोरदार विरोध सुरु असताना अनेक राजकीय लोकांनी राज्यपालांच्या हक्कालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाई करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

नेमकं काय आहे उदयनराजे यांच्या पत्रात?

काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करुन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्देवी आहे. याकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे. आणि दुसरे वक्तव्य हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असं उदयनराजे म्हणाले आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान केलाच आहे. पण यापूर्वीही त्यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केले होते. शिवाजी महाराजांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे”, अशी तक्रार उदयनराजे यांनी केलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. हे सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांना जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वत: बदलायला तयार नाहीत”, असं उदयनराजे म्हणाले आहेत. महाराष्ट्रात अडीच वर्षे होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्देवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत, असं मत त्यांनी मांडलं.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com