भूषण देसाईंच्या प्रवेशाला भाजपचाच विरोध; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला थेट इशारा, मित्राची चूक युतीवर भारी पडेल

भूषण देसाईंच्या प्रवेशाला भाजपचाच विरोध; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला थेट इशारा, मित्राची चूक युतीवर भारी पडेल

उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मुंबई : उध्दव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का मानण्यात येत आहे. परंतु, भूषण देसाई यांच्या प्रवेशाला भाजपकडूनच विरोध होत आहे. यासंदर्भात भाजप नेत्याने एकनाथ शिंदे यांना थेट पत्रच लिहीले आहे. यामुळे आता शिंदे गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भूषण देसाईंच्या प्रवेशाला भाजपचाच विरोध; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे दिला थेट इशारा, मित्राची चूक युतीवर भारी पडेल
चौकशीमुळे शिंदे गटात सामील झालो नाही तर...; भूषण देसाईंनी सांगितले कारण

बाळासाहेब हेच माझं दैवत आणि शिवसेना हे दोन शब्द सोडून माझ्या समोर दुसरं काही आलेलं नाही. कोणत्याही चौकशीमुळे नाहीतर एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत आवडली म्हणून प्रवेश केल्याचे भूषण देसाईंनी म्हंटले आहे. याच मुद्द्याला खोडून काढत गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष संदीप जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. भ्रष्ट व्यक्तीमत्व असलेल्या नेत्यांच्या मुलांना पक्षांमध्ये प्रवेश देऊ नये, अशी थेट मागणीच संदीप जाधव यांनी पत्रात केली आहे. भूषण सुभाष देसाई हा फक्त आणि फक्त कोणत्या ना कोणत्या तरी आर्थिक व्यवहारातून वाचण्यासाठीच आपल्याकडे आला आहे. भ्रष्ट आणि मलिन चरित्र्याच्या व्यक्तिमत्त्वाला आपण राजकीय आश्रय दिल्यामुळे गोरेगावकरांमध्ये संतप्त भावना आहेत. आपली युती आहे मित्राची एक चूक दोन्ही पक्षांना भारी पडू शकते, असा थेट इशाराच संदीप जाधवांनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

दरम्यान, चार महिन्याआधी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरीचे आरोप केले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com