eknath-shinde-fadnavis
eknath-shinde-fadnavis

मुंबईत आजपासून भाजप-शिवसेनेची आशिर्वाद यात्रा

सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.
Published by :
Pankaj Prabhakar Rane

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची आशीर्वाद यात्रा रविवारपासून मुंबईत सुरू होणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्र परिषदेत दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे.

eknath-shinde-fadnavis
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची तोफ आज खेडमध्ये धडाडणार

दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशा सहा यात्रा निघतील. 5 मार्च, 9 आणि 11 मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा जाईल. त्यानंतर 14 मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होणार आहे. यानिमित्ताने पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने आतापासून मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com