Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

"उद्यापासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं" बावनकुळेंची विरोधकांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हा राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे आज देशासह संपूर्ण राज्यात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु, या धुळवडीत राजकीय रंग सुद्धा उधळल्या गेल्याचे दिसून आले. आज नागपुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या लहानपणापासूनच्या मित्रांसोबत होळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करून महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. असे विधान केले आहे.

Chandrashekhar Bawankule
'आमचे काही मित्र आहेत त्यांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली' का म्हणाले फडणवीस असे?

काय म्हणाले बावनकुळे?

आजचा दिवस हा मनभेद आणि मतभेद बाजूला करून एकत्रितपणे काम करण्याचा दिवस आहे, आजच्या दिवशी महाराष्ट्रात सुद्धा सर्वच पक्षांनी सर्वच नेत्यांनी सर्व स्तरावरचे मनभेद दूर करून महाराष्ट्र देशात क्रमांक एक करण्याकरिता सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे, असे विधान त्यांनी केले.

त्यानंतर पुढे त्यांना आज होळीच्या दिवशी विरोधकांना काय विनंती कराल, असा प्रश्न विचारले असता त्यावर बोलताना ते म्हणाले की, मी आव्हान करण्यासाठी एवढा मोठा नाही मी विरोधकांना विनंती करेल की आजपासून आपले मनभेद आणि मतभेद दूर करून हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे कसा जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श घेऊन कसं हा राज्य पुढे नेता येईल, यासाठी प्रयत्न करावे. संजय राऊतांकडून अपेक्षा करेल की त्यांनी उद्यापासून मनभेद आणि मतभेद विसरून महाराष्ट्रासाठी एकत्रितपणे काम करावं. असे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com