Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

'आमचे काही मित्र आहेत त्यांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली' का म्हणाले फडणवीस असे?

हे जग सप्तरंगी आहे असे दाखवून देतो. असेच रंग आमच्या बजेटमध्ये दिसेल.

आज देशासह राज्यात सुद्धा मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात येत आहे. त्यातच दुसरीकडे राजकीय मंडळी देखील आजच्या दिवशीसह राजकीय रंग उधळवत आहेत. आज मुंबईत धुळवडीच्या कार्यक्रमात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. मी आधी बोलो होतो मी बदला घेणार, परंतु, आमचा बदला असा आहे की आजच्या दिवशी विरोधकांना माफ केलं. असे देवेंद्र फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले.

Devendra Fadnavis
'ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या...' सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आज मुंबई माध्यमांशी बोलत असताना बजेट संबंधी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पहिले तर महाराष्ट्रातील सर्व लोकांना होळीच्या शुभेच्छा. होळी आणि रंगपंचमी हे असे पर्व त्या दिवशी वाईट सोडून देतो. सोबतच एकमेकांना रंग लावून एकमेकांना एकमेकांच्या रंगात रंगवतो. आणि हे जग सप्तरंगी आहे असे दाखवून देतो. असेच रंग आमच्या बजेटमध्ये दिसेल. असे ही ते यावेळी म्हणाले.

पुढे त्यांना होळीच्या दिवशी शत्रूंना माफ केलं जाते असा प्रश्न विचारण्यात आले त्यावर ते म्हणाले की, आमचे काही मित्र आहेत त्यांना खोटं सांगून कुणीतरी भांग पाजली होती. त्यानंतर कुणी गाणं गात होतं, कुणी रडत होतं. असा नशा करण्यापेक्षा भक्तीचा नशा, संगीताची नशा करावी, कामाची नशा करावी. आम्ही विधानसभेमध्ये सांगितलं होतं की या सर्वाचा आम्ही बदला घेणार, आता या होळीच्या दिवशी सर्व विरोधकांना आम्ही माफ केलं, विरोधकांच्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही कटुता नाही, हाच आमचा बदला आहे. असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com