Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

गडकरींबाबत केलेल्या राऊतांच्या 'त्या' वक्तव्याला बावनकुळेंचं खरमरीत प्रत्युत्तर

भारताने केली 60 वर्षे काँग्रेस बघितली आहे. साडेतीनशे जागांवरून काँग्रेस आता दोन आकड्यात पोचली आहे. बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा.
Published by :
Sagar Pradhan
Published on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर कॅगच्या अहवालात ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर विरोधकांकडून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. सोबतच भाजपमध्ये गडकरींना डावलण्याच्या प्रयत्न होतोय असा देखील आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी नितीन गडकरींबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यावरच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
भाजपवर गंभीर आरोप करत ठाकरे गटाच्या नेत्याकडून गडकरींना मोठी ऑफर

नक्की काय म्हणाले बावनकुळे?

चंद्रपुरात भाजपची पदाधिकारी कार्यकर्ता बैठक पार पडली. यावेळी त्याठिकाणी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांना गडकरी समजलेच नाही. गडकरी पक्षासाठी समर्पित नेते असून त्यांनी विपरीत परिस्थितीत पक्ष वाढवला आहे. राऊत यांना गडकरींना समजण्यासाठी वेळ लागेल. असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी राऊतांना दिलं.

पुढे काँग्रेसवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, भारताने केली 60 वर्षे काँग्रेस बघितली आहे. साडेतीनशे जागांवरून काँग्रेस आता दोन आकड्यात पोचली आहे. काँग्रेस बुडते जहाज असून देशाने आता आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहण्याचा निश्चय केला आहे. भारत पंतप्रधान मोदींच्या मागे उभा राहील. असे देखील ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com