BBC Raid On Bjp
BBC Raid On BjpTeam Lokshahi

कायद्याचे पालन करूनच..., बीबीसीवरील छापेमारीनंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

इंदिरा गांधी यांनी देखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे.

राज्याच्या राजकारणासह देशातील राजकारणात सुद्धा विविध घडामोडी घडत आहे. या दरम्यान, आज बीबीसी न्युजच्या दिल्लीतल्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बीबीसी कार्यालयात सर्वेक्षण केले जात आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. प्राप्तिकर विभागाची ही कारवाई म्हणजे अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका काँग्रेसने केली. भाजपवर सर्वच स्तरावरून टीका होत असताना आता भाजपने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

BBC Raid On Bjp
'जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू' बीबीसी कार्यलयावरील धाडीवर ठाकरेंची प्रतिक्रिया

काय दिली भाजपने प्रतिक्रिया?

प्राप्तिकर विभागामार्फत बीबीसीवर झालेल्या कारवाईनंतर भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले की, बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने कायद्याचे पालन करूनच छापेमारी केली. आज पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताची चांगली प्रगती होत आहे. मात्र काही लोकांना हे आवडत नाही. बीबीसीला भारतात पत्रकारिता करण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतातील कायद्यांचे पालन करून ते त्यांची पत्रकारिता करू शकतात, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे कॉंग्रेसने केलेल्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी देखील बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवण काँग्रेसने ठेवली पाहिजे. भारतात प्रत्येक संस्थेला कायद्याचे पालन करून काम करण्याची संधी दिली जाते. मात्र, त्यासाठी त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा. काँग्रेस पक्ष चीन, बीबीसी तसेच दहशतवाद्यांच्या बाजूने का उभा राहतो. असे प्रत्युत्तर भाजपने काँग्रेसला दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com