राजकारणामुळे दुरावलेल्या भावाने बहिणीच्या कार्यक्रमात रांगेत उभे राहून बांधून घेतली राखी

राजकारणामुळे दुरावलेल्या भावाने बहिणीच्या कार्यक्रमात रांगेत उभे राहून बांधून घेतली राखी

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. फुटीनंतर शिवेसेनेच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, काहींनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला.

मंगेश जोशी | जळगाव : एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. फुटीनंतर शिवेसेनेच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, काहींनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला. अशात, अनेक घरातील एक व्यक्ती ठाकरे गटात तर दुसरी शिंदे गटात असल्याचेही दिसून आले. असेच काहीसे पाचोऱ्यात दिसून आले आहे. आमदार किशोर पाटील व व त्यांच्या भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्या शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर दुरावा निर्माण झाला आहे.

राजकारणामुळे दुरावलेल्या भावाने बहिणीच्या कार्यक्रमात रांगेत उभे राहून बांधून घेतली राखी
भद्राकाळात राखी बांधली तर वाईट होईल? नेमके काय आहे तथ्य? पंचांगकर्ते सोमण यांनी केले स्पष्ट

आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात असून वैशाली सूर्यवंशी ह्या ठाकरे गटात आहेत. राजकारणामुळे त्यांच्यात हा दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी आमदार किशोर पाटील यांना स्वतः आमंत्रित करत वैशाली सूर्यवंशी यांनी राखी बांधली होती. मात्र, यावर्षी शिंदे व ठाकरे गटातील संघर्ष हा अधिक तीव्र झाल्याने या बहिण भावातील दुरावाही हा वाढला आहे. मात्र, ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात नागरिकांसमवेत रांगेत उभे राहून किशोर पाटील यांनी आपली भगिनी वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून राखी बांधून घेतली. आणि बहिण-भावातील वैचारिक दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com