राजकारण
तब्बल 7 वर्षांनंतर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक; कोणते निर्णय होणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून कॅबिनेटची बैठक होत आहे. 2 दिवस ही बैठक चालणार असून या बैठकीसाठी पूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालं आहे. तब्बल 7 वर्षानंतर मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
७ वर्षांपूर्वी झालेल्या बैठकीत ५० हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली होती. मराठवाड्यातील अनेक संघटना निवेदन देणार आहेत. या बैठकीत सुमारे 40 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांचे पॅकेज जाहीर केले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीत आता कोणते निर्णय होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.