Navneet Rana
Navneet Rana Team Lokshahi

'लव्ह जिहाद' प्रकरणावरून खासदार नवनीत राणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

संबंधित मुलाला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल

अमरावतीत एका हिंदू मुलीला आंतरधर्मीय विवाह करण्यास लावले आणि तिला डांबून ठेवले. हा लव्ह जिहाद आहे" असा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मोठा गोंधळ केला होता. मात्र, त्या प्रकरणाचे खरे कारण समोर आल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना लव जिहादचे आरोप करणे चांगलेच भोवले आहे. कथित लव्ह जिहाद प्रकरणात नववीत राणा विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Navneet Rana
अमरावतीत शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत राडा; पोलिसांचा लाठीचार्ज

मुलावर लव जिहादचे आरोप करणे पडले महागात

खासदार नवनीत राणा यांनी नुकताच अमरावतीच्या राज्यापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ घालत एका मुलीसोबत लव्ह जिहाद प्रकरणातून अपहरण करण्यात आले आहे. असा आरोप त्यांनी केला होता. मात्र, ती मुलगी सापडल्यानंतर खरे कारण समोर आल्यामुळे राणा विरोधात संबंधित मुलावर लव जिहादचे आरोप करणे महागात पडले आहे.

संबंधित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचीही नोंद करण्यात आली आहे. कथित लव जिहाद प्रकरणात मुलाला धमकावल्याचा व बदनामी केल्या प्रकरणी हा संपूर्ण गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या संबंधी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

Navneet Rana
'बाळासाहेब ठाकरेंचे पुत्रच हिंदूंच्या सणाला विरोध करतात, जनता माफ करणार नाही'

सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन केली होती राणांवर कारवाईची मागणी

राज्यापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ प्रकरणात सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी याबाबत तीव्र शब्दांत खासदार नवनीत राणा यांचा निषेध केला आहे. हे खासदार,आमदार शासनाच्या कोणत्याही कार्यालयात जातात आणि अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करतात हे अत्यंत निंदनीय आहे. नवनीत राणांच्या विरोधात ताबडतोब गुन्हा दाखल करा आणि त्यांवर कडक कारवाई करा अन्यथा राज्यभर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला होता.

Lokshahi
www.lokshahi.com