प्रियंका गांधींना केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; कारण काय?

प्रियंका गांधींना केंद्रीय निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस; कारण काय?

पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेमुळे प्रियंका गांधी अडचणीत आल्या आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेमुळे प्रियंका गांधी अडचणीत आल्या आहेत. प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, मोदीजी, हे BHEL होतं, जिथून आम्हाला रोजगार मिळत होता, ज्यातून देशाची प्रगती होत होती, तुम्ही त्याचे काय केले, कोणाला दिले, तुम्ही कोणाला दिले, का दिले? तुमच्या मोठ्या उद्योगपती मित्रांना का दिले असा सवाल प्रियंका गांधींनी विचारला होता.

प्रियांका गांधी यांनी एका रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावरुन आता प्रियंका गांधी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात किलेल्या वक्तव्यामुळे प्रियंका गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयोगाने प्रियांका गांधींना १६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com