Devendra Fadnavis : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार

Devendra Fadnavis : केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लादले आहे. याविरोधात ठिकठिकणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तात्काळ केंद्र सरकारने निर्यात शुल्क रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे.

फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com