kalyan
kalyan Team Lokshahi

मुख्यमंत्री शिंदेंनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांचा डोंबिवली ते भिवंडी बोटीने प्रवास

कल्याण लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर

अमजद खान|कल्याण: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे कल्याण लोकसभा मतदार संघात तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा पहिला दिवस होता.आज त्यांनी कार्यकर्ते पदाधिकार्यांची बैठक घेतली.सायंकाळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी डोंबिवली मोठा गाव येथून वेलेगाव भिवंडी असा बोटीने प्रवास केला.

अनुराग ठाकूर हे डोंबिवली ते वेलेगाव असा बोटीने प्रवास करत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरी गेले. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ,आमदार निरंजन डावखरे देखील होते. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून डोंबिवलीत या बोटीच्या प्रवासाची चर्चा सुरू झाली आहे.

kalyan
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर घणाघात म्हणाले, भारत जोडो यात्रेत भारताचे तुकडे....

आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यानिमित्त त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी भारत जोडो पासून तर मेमनच्या कबरी प्रकरणावर यावेळी भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, याकूब मेमनच्या कबरीबाबत विरोधकांकडून भाजपला लक्ष करण्यात येत आहे. भारत जोडो यात्रेत भारताचे तुकडे करण्याची स्वप्ने रंगविनाऱ्या तुकडे गँगचे लोकच दिसतात. जेएनयूए युनिव्हर्सिटी मध्ये भारताचे तुकडे करणारी पोस्टर चिकटवत 'भारत तेरे तुकडे होंगे हजार, अशा घोषणा देणाऱ्यांना भेटायला जाणाऱ्यांना राहुल गांधी चे भारत जोडो प्रेम खोटे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Lokshahi
www.lokshahi.com