Narayan Rane
Narayan RaneTeam Lokshahi

'राऊत सिंधुदुर्गला लागलेली कीड' राऊतांच्या आरोपावर राणेंची जोरदार टीका

सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात. संजय राऊतांवर बोचरी टीका

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या करण्यामागे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चिथावणी असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे हत्या प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना पक्कं माहिती आहे. त्याचं नाव समोर येऊ द्या, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती. तर विनायक राऊत यांनी थेट राणे पिता-पुत्रांचं नाव घेऊन संशय व्यक्त केला. यावरच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Narayan Rane
राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोचा उदय सामंतांकडून खुलासा; म्हणाले, ‘खाणेरडं राजकारण’...

नेमकं काय म्हणाले नारायण राणे?

पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावर बोलताना म्हणाले की, हे जे घडले आहे ते का घडले, कशामुळे घडले ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. संजय राऊतांची मी दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्राचे मोठे नेते असं कोणी नाही. बदनाम आहेत. सामना चालत नाही, म्हणून ते ब्रेकींग न्यूज टाकल्या जाव्यात यासाठी प्रयत्न करतात. अशी टीका त्यांनी राऊत यांच्यावर केली.

पुढे त्यांनी विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना म्हणाले की, मी त्या आरोपीला भेटलो नाही. विनायक राऊतला सिंधुदुर्गला काही झालं तरी एकच नाव तोंडावर येते, राऊत सिंधुदुर्गला लागलेली कीड आहे. पत्रकाराच्या मृत्यूशी काही संबंध नाही. चौकशी मध्ये नाव येईल. तेव्हा पाहून घेऊ. अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी विनायक राऊत यांच्यावर केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com