CM Eknath Shinde : पुणे चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची दांडी?

CM Eknath Shinde : पुणे चांदणी चौक लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्र्यांची दांडी?

चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरात आता वाहतूक कोंडी संपणार आहे.

या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. या कार्यक्रमासाठी समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com