राजकारण
Chandni Chowk Inauguration: सर्व सोंग करता येतात पण...; अजित पवार म्हणाले
पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला. अजित पवार म्हणाले की, अनेक शहरांमध्ये रींग रोड झाले. त्यासाठी नितीन गडकरी यांनी जबाबदारी घेतली. नेता असावा तर नितीन गडकरींसारखा. सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही. नितीन गडकरी यांनी पैशाची कमी पडू दिले नाही. दिलदारपणे त्यांनी अडचणी सोडवल्या. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला. असे अजित पवार म्हणाले.