आमदारांना सांभाळता-सांभाळता फडणवीसांचे वजनही कमी होतयं; खैरेंचा टोला
छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक दिवसांपासून रखडलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे खातेवाटप अखेर जाहिर झाले आहे. यात सध्याच्या खात्यांमध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले आहे. खातेवाटपामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारच वरचढ ठरले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्थमंत्रीपद हे अजित पवारांना मिळेल हे मी आधीच सांगितले होते. या सरकारला आता उतरती कळा लागलेली आहे. सर्व आमदारांना सांभाळता सांभाळता देवेंद्र फडणवीस यांचे वजन सुद्धा कमी होत चालला आहे. देवेंद्र फडणवीस चिकन सुद्धा खातात त्यांनी मला सांगितले आहे. मी त्यांना हात जोडून विनंती करतो उरलेल्या दिवसात लोकांची सेवा करा, असे आवाहन चंद्रकांत खैरेंनी फडणवीसांना केली आहे.
दरम्यान, आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. यावरुन चंद्रकांत खैरे यांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत नवीन तारीख दिली आहे. मंत्रिमंडळाचा खूप चांगला बदल झाला आहे 16 दिवसात 16 आमदार जाणार आहे म्हणून त्यांचे खाते कमी करून टाकले उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करून गेलेले यांना क्षमा नाही, असेही खैरेंनी म्हंटले आहे.