माझ्या वक्तव्याचा 'ध'चा 'म' केला जातोय; वादानंतर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण, बाळासाहेबांविषयी नेहमीच आदर

माझ्या वक्तव्याचा 'ध'चा 'म' केला जातोय; वादानंतर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण, बाळासाहेबांविषयी नेहमीच आदर

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे.

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या बाबरी मशीदसंदर्भातील विधानावरुन नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विधानावर खुलासा केला आहे. माझं वक्तव्य चुकीच्या मार्गाने घेतले गेले. बाळासाहेब यांच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

माझ्या वक्तव्याचा 'ध'चा 'म' केला जातोय; वादानंतर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण, बाळासाहेबांविषयी नेहमीच आदर
चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले; उध्दव ठाकरेंनी केली राजीनाम्याची मागणी

माझं वक्तव्य चुकीच्या मार्गाने घेतले गेले. माझी मुलाखत चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली. बाळासाहेब यांच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात असे कधीच विचार येऊ शकत नाही. विषय बाबरी मशीदचा आहे. प्रत्यक्ष ढाचा पाडताना सगळे हिंदू होते. मी शिवसैनिक नव्हते असे म्हणालो नाही. प्रत्यक्ष ढाचा पडताना शिवसैनिक होते का? असा प्रश्न होता का तर तिथे सगळे हिंदू होते, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे. माझा प्रश्न आहे की बाबरी मशीद पडताना संजय राऊत कुठे होते, असा पलटवार त्यांनी राऊतांवर केला आहे.

माझ्या वक्तव्याचा ध चा म केला जातोय. मातोश्रीसोबत माझे संबंध चांगले आहेत. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलणार नाही. बाळासाहेब यांचा अनादर कधीच होणार नाही. जयंत पाटलांवर मी बोलणार नाही. उध्दव ठाकरेंवर बोलेन कारण ते माझ्या जवळचे संबध आहेत. मी त्यांना फोन करुन विचारेन की तुम्ही मलाच अस कस बोलता म्हणून. मला तातडीनं मुख्यमंत्री यांचा फोन आला. ते म्हणाले तुम्ही लगेच पत्रकार परिषद घ्या. आणि बाळासाहेब यांच्याबद्दल अनादर नाही, हे सांगा, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या विधानावर उध्दव ठाकरे यांनी घणाघात केला होता. काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. मिंधेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उध्दव ठाकरेंनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com