Chandrakant Patil : पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी, आपली झोप उडेल, अशी ही मोठी लिंक...

Chandrakant Patil : पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी, आपली झोप उडेल, अशी ही मोठी लिंक...

पुण्यात 18 जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती.
Published by  :
Siddhi Naringrekar

पुण्यात 18 जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. एनआयएने कोंढवा परिसरात दोन ते तीन वेळा छापाही टाकला. या छाप्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते. याच पार्श्वभूमीवर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपणास सर्वांना हदरा बसेल, आपली झोप उडेल, अशी मोठी लिंक दहशतवाद्यांची आहे. पुणे शहरात दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे. या संदर्भात मला माहिती जाहीर करण्यास मर्यादा आहेत. परंतु पुण्यात अतिरेक्यांची मोठी लिंक सापडली आहे. या दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते जाहीरपणे सांगण्यास मर्यादा आहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com