Chandrasekhar Bawankule | Nitin Gadkari
Chandrasekhar Bawankule | Nitin Gadkariteam lokshahi

...तर बावनकुळेंना मुख्यमंत्री पदाची संधी; नितीन गडकरी

'भाजपच्या आमदार खासदारांनी आपल्या पोरांसाठी तिकीटं मागू नये'
Published by :
Shubham Tate

Chandrasekhar Bawankule Nitin Gadkari : राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला आहे. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुफान फटके बाजी केली. (Chandrasekhar Bawankule felicitated in Nagpur BJP state president Nitin Gadkari)

Chandrasekhar Bawankule | Nitin Gadkari
Sunday Mega Block : मुंबईत 'या' मार्गावरील सेवा रद्द, जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे

चंद्रशेखर बावनुकळे यांचा जीवनपट हा रिक्षा चालकापासून सुरु होतो. बाकीचं काही सांगत नाही. पण, बायकोसुद्धा त्यांनी पळवून आणली आहे. तुम्हाला माहिती नसेल त्यांची पत्नी ही कुणबी समाजाची, तर ते तेली समाजाचे आहेत. ते कसं घडवून आणलं, ते मला एकट्याला सांगतील. हे तरुण कार्यकर्त्याच्या उपयोगाचे आहे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये, असा गौप्यस्फोट केला.

Chandrasekhar Bawankule | Nitin Gadkari
खासदारकी काय मह्या बापाची आहे का?रावसाहेब दानवेंचा खासदारकी सोडण्यास नकारच

राज्यात प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर काय होते हे मला माहित आहे. चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होतील असे मी म्हणणार नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर बावनकुळे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे, असे सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

या कार्यक्रमात नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. सर्वांनी बावनकुळे यांचा आजवरचा जीवनप्रवास उलगडून सांगितला आणि त्यांचं अभिनंदन केलं. पण सर्वाधिक लक्ष वेधलं ते म्हणजे नितीन गडकरी यांच्या भाषणानं. गडकरींनी आपल्या स्टाइलमध्ये तुफान फटकेबाजी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com