राजकारण
Video : काय मूर्खपणा लावलायं; बावनकुळे 'त्या' महिलेवर संतापले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 20 ऑगस्टपासून सुरू झालेली राज्यव्यापी जनसंवाद यात्रा आज वाशिम शहरात आली.
गोपाळ व्यास | वाशिम : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 20 ऑगस्टपासून सुरू झालेली राज्यव्यापी जनसंवाद यात्रा आज वाशिम शहरात आली. वाशिम शहरात आज 'घर चलो' अभियान जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असताना चंद्रशेखर बावनकुळे यादरम्यान एका महिलेने औक्षण केले. यावेळी काय मूर्खपणा लावला आहे, असे उदगार काढत बावनकुळे महिलेवर चांगलेच संतापले. एकीकडे भाजपा राज्यभरात घर चलो अभियान राबवत असताना दुसरीकडे महिलांना अशी वागणूक दिल्याने भाजपा महिलांचा सन्मान विसरली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.