उध्दव ठाकरेंची साथ आणखी काही नेते सोडणार : बावनकुळे

उध्दव ठाकरेंची साथ आणखी काही नेते सोडणार : बावनकुळे

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही.

मुंबई : राज्यात शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार वाद सुरु असताना दुसरीकडे मात्र, शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. मुंबईतून शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. गजानन कीर्तिकर सारखे माणूस पक्ष सोडतात हे उद्धव ठाकरे यांनी विचार करण्यासारखे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

उध्दव ठाकरेंची साथ आणखी काही नेते सोडणार : बावनकुळे
फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो; राऊतांचा इशारा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गजानन कीर्तिकर सारखे माणूस पक्ष सोडतात हे उद्धव ठाकरे यांनी विचार करण्यासारखे आहे. उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खदखद आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या घराला जाण्याशिवाय पर्याय नाही. उध्दव ठाकरे यांची साथ आणखी काही नेते सोडणार आहेत, असे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

संघटनात्मक गती देण्यासाठी आपला दौरा सुरू आहे. राहुल गांधी यांची महाराष्ट्रात भारत जोडा यात्रा सुरू असताना कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्यात राहुल गांधी दौरा सुरू असताना राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते भाजपात प्रवेश केले आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या आणि आपल्या मुलांसाठी हायजॅक केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उध्दव ठाकरेंची साथ आणखी काही नेते सोडणार : बावनकुळे
शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

तर, यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही घणाघात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता गेल्या पासून अस्वस्थ आहे. सत्तेपासून पैसा आणि पैशांपासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण आहे. राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता याला काही मिळत नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही मिळत नाही. उमेदवार देखील मिळणार नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com