संजय राऊतांवर उध्दव ठाकरे गप्प का? बावनकुळेंचा सवाल

संजय राऊतांवर उध्दव ठाकरे गप्प का? बावनकुळेंचा सवाल

चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी विधीमंडळ हे चोरमंडळ यांच्या विधानावरुन अधिवेशनात एकच गदारोळ झाला. राऊतांवर हक्कभंग आणण्याची मागणीही सत्ताधऱ्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उध्दव ठाकरे यांनी कारवाई करावी, निदान फेसबुक लाईव्ह करून तरी भूमिका स्पष्ट करावी, असा टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊतांवर उध्दव ठाकरे गप्प का? बावनकुळेंचा सवाल
राऊतांच्या अडचणी वाढणार! शिंदे-फडणवीसांची हक्कभंग समितीची घोषणा; नितेश राणेंचा समावेश

संजय राऊत जे बोलतात त्यांना उध्दव ठाकरे यांची मान्यता असते. ते सामना मधून जे लिहितात त्याला त्यांची मान्यता असते. संजय राऊत जे बोलले ते उध्दव ठाकरे यांना मान्य आहे का, यावर सगळे पक्ष बोलले ते का बोलत नाही. जर ठाकरे सहमत नसेल तर राऊत यांचं राजीनामा घ्यावा. बाकी वेळेस प्रेस घ्यायला ठाकरे तत्पर असतात आज का बोलत नाही. असा प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे.

हक्कभंग समिती जे कारवाई करायची ती करेल पण उध्दव ठाकरे यांनी कारवाई करावी, निदान फेसबुक लाईव्ह करून तरी भूमिका स्पष्ट करावी. आदित्य ठाकरे यांनी समोर येऊन बोलावं. 12 कोटी जनतेच्या मतांचा अपमान झाला आहे. संजय राऊत यांनी माफी मागितली पाहिजे. ते कारागृहात राहून आले त्यामुळे त्यांना माफी मागण्याची सवय नाही, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून भाजपाने विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. कसबा, चिंचवड दोन्ही जागा आम्ही जिंकू ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर पक्षाने तिथे काम केलं आहे. एक्झिट पोल वर विश्वास ठेवू नका. कसबामध्ये भाजपच निवडून येईल, असे बाबनकुळे यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com