महाविकास आघाडीचे नेतेच अजित दादांना बदनाम करताहेत; बावनकुळेंचा आरोप

महाविकास आघाडीचे नेतेच अजित दादांना बदनाम करताहेत; बावनकुळेंचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या.

पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतु, अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भाजप प्रवेशाच्या या चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते अजित दादांना बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचे नेतेच अजित दादांना बदनाम करताहेत; बावनकुळेंचा आरोप
...म्हणून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार

महाविकास आघाडीचे नेते अजित दादांना बदनाम करत आहेत. मागील 3 महिन्यात ते मला भेटले नाहीत. ते कुणाला भेटले असतील असेही वाटत नाही. पहाटेच्या शपथविधी पासून त्यांची प्रतिमा डागळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरुन भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, कार्यकर्त्यांचा पूर्वइतिहास पाहण्याची गरज नाही. आज त्यांनी आमची विचारधारा मान्य केली आणि त्यानुसार पुढे काम करणार असतील तर त्यांचे स्वागत, असे म्हणत त्यांनी पक्षप्रवेशाचे समर्थन केले.

तसेच, केवळ अजित पवार म्हणून नाहीतर कोणीही आमचा विचार स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी जो कोणी आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

राज ठाकरे कधी भाजपचे पोपट होऊ शकतात का? संजय राऊत काहीही बोलतात. संजय राऊतांवर मला फार काही बोलायचं नाहीये. त्यांना सध्या काही काम नाही. त्यांचे लोक सोडून जात आहेत. शिल्लक सेना राहिलीय, अशी टीकाही त्यांनी ठाकरे गटावर केली आहे.

दरम्यान, खारघर घटनेला अनेक कारणे आहेत. पण, सरकार म्हणून जबाबदारी आमचीच आहे. दुःखद घटना घेऊन गेली, त्यातून काय शिकता येईल आणि पुन्हा घडू नये याचा विचार केला गेला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com