काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी; बावनकुळेंचा घणाघात

काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी; बावनकुळेंचा घणाघात

उध्दव ठाकरेंची अमित शहांवर टीका; चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील एका प्रचार सभेत भाजपला निवडून द्या, तुम्हाला रामलल्लाचं मोफत दर्शन घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. यावरुन उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर टीकेची तोफ डागली होती. भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय तर त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची, असे उध्दव ठाकरेंनी म्हंटले होते. या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.

काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी; बावनकुळेंचा घणाघात
भाजपनं टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी उघडलीयं का? राज ठाकरेंचा खोचक सवाल

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली आहे. रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतोय. काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला तरी करोडो रामभक्त अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतील, अशी टीका त्यांनी केली आहे.

तर, आपण आणि देशाने बघितलं आहे की काँग्रेसचा राम मंदिराला विरोध आहे. त्यांच्या वागण्यातून ही भूमिका दिसली. पण उद्धव ठाकरे काँग्रेसच्या खूप जवळ गेले की आता दर्शनाला जाण्याकरीता विरोध करता आहे. मला आश्चर्य वाटलं की उद्धव ठाकरे सुद्धा अस म्हणतील. बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा दुखावल असेल, अशा शब्दात बावनकुळेंनी निशाणा साधला आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे?

आमची अमित शहांकडे पहिली मागणी अशी आहे, की तुम्ही देशाचे केंद्रीय मंत्री आहात, केवळ मध्यप्रदेशपुरते नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जे रामलल्लाचे भक्त आहेत. त्यांना त्यांच्या सोयीनुसार मोफत अयोध्यावारी करावी. आचारसंहितेत केलेला बदल केवळ भाजपलाच सांगितला आहे का? अमित शाह आणि मोदींनी जर चुकीचे केले नसेल तर आम्ही जे त्यावेळी केले ते योग्य की अयोग्य होते ते कळू द्या. आता नियमावलीत ढिलाई आणली असेल तर आम्हीसुद्धा तसा प्रचार करू शकतो की नाही, ते त्यांनी सांगावे, अशी टीका उध्दव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर साधला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com