सामना बहिरा, आंधळा व हिरवा झालाय; बावनकुळेंचे राऊतांना प्रत्युत्तर

सामना बहिरा, आंधळा व हिरवा झालाय; बावनकुळेंचे राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी सामना संपादकीयमधून बावनकुळेंवर हल्लाबोल केला. याला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना संपादकीयमधून बावनकुळेंवर हल्लाबोल केला. याला आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सामना बहिरा, आंधळा व हिरवा झालाय; बावनकुळेंचे राऊतांना प्रत्युत्तर
फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी औरंगजेब कसा आहे, हे मी मांडले होते. त्यावर 'सामना'ने मी 'औरंगजेबजी' म्हटले, असे प्रसिद्ध केले. क्रूरकर्मा, पापी औरंग्या जितेंद्र आव्हाड यांना कसा 'आदरणीय' आहे, यासाठी दाखला देताना छत्रपती श्री संभाजी महाराज यांना हालहाल करुन त्यांचे प्राण घेणारा औरंग्या किती नीच, क्रुर, दुष्ट, अमानुष आहे. तरी आव्हाड औरंग्याला शुद्धतेचे प्रमाणपत्र देतात. याची कीव आली. म्हणूनच मी पापी औरंग्या आव्हाडांना किती प्रिय, आपुलकीचा व श्रद्धास्थानी आहे हे सांगण्यासाठी, औरंग्या आव्हाडांसाठी 'औरंगजेबजी ' आहे, असे उपरोधाने म्हणालो.

उपरोधही समजू नये, हे अनाकलनीय व दुर्दैवी आहे. त्या औरंग्याला मी स्वप्नातही 'जी ' म्हणू शकत नाही. हे पुन्हा सांगतो आणि आयुष्यभर सांगेन. मी यापूर्वीच यावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना बहिरा आणि आंधळा झाला आहे. हे आता सांगायचीही गरज नाही. सामनाचे अंतरंग व बाह्यरंग 'हिरवे' झाले आहे. त्यांनी भगवा रंग काढून टाकावा.

सामना बहिरा, आंधळा व हिरवा झालाय; बावनकुळेंचे राऊतांना प्रत्युत्तर
फक्त गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधान मोदींना शोभत नाही; राज ठाकरेंचा टोला

औरंग्याने हिंदूंवर क्रूर अत्याचार केले. हिंदुसाठी अतिशय कडक नियम केले. इस्लामच्या आधारे राज्यकारभार राबवून हिंदूंच्या स्थळांवर कर लादला. हिंदू रितीरिवाजांनुसार साजरे होणार्‍या सणांवर त्याने बंदी घातली. त्याने हिंदूंवर जुलूम जबरदस्ती करत जिझिया कर लादला. जिझिया कर हा फक्त हिंदूंना भरावा लागत होता. आज सामनाकारांनी आपले वर्तन व समज यापेक्षा वेगळे नाही हेही दाखवून दिले. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा, असा समज पसरविण्याचा अनाठायी प्रयत्न केला.

सामनाकरांनी लक्षात घ्यावे, आम्ही आमच्या हिंदुत्ववाशी नाते घट्ट ठेवून आहोत. तुमचे काय ते तुम्ही "दाखवून" दिले आहे. पुन्हा सांगतो, औरंग्या धर्मांध होता. खुनशी, विश्वासघातकी, बदफैली, राक्षसी महत्वाकांक्षी आणि दुर्जन होता. तो आव्हाडांच्या प्रेरणास्थानी असू शकतो आणि सामनाकारांना त्याचे आकर्षण देखील वाटू शकते, अशी जोरदार टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com