...तर तुम्हाला सोडणार नाही; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

...तर तुम्हाला सोडणार नाही; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

रोशनी शिंदे प्रकरणी उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केली होती. यावरुन बावनकुळेंनी जोरदार टीका केली आहे.

मुंबई : रोशनी शिंदे प्रकरणी उध्दव ठाकरेंनी एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेंना थेट शेवटचा इशारा दिला आहे. फडणवीसांबद्दल बोललात, तर तुम्हाला सोडणार नाही. याला धमकी समजा, अशा शब्दांत बावनकुळेंनी इशारा दिला.

...तर तुम्हाला सोडणार नाही; बावनकुळेंचा उध्दव ठाकरेंना इशारा
आमचे गृहमंत्री 'फडतूस' नाही 'काडतूस' आहेत; शेलारांचे उध्दव ठाकरेंना उत्तर

देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. उद्धव ठाकरेंसारखे घरकोंबडा नाहीत. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले त्यांना कशाची जाण नाही. खरंतर उद्धव ठाकरेंची भाषा मला बोलता येत नाही. मी नागपूरचा आहे पण, आमचे संस्कार आडवे येतात. ज्यांनी फेसबुक लाईव्ह शिवाय काहीच केलं नाही. इतकं वाईट सरकार चालवलं. यांचे दोन-दोन मंत्री जेलमध्ये होते. अत्यंत निराश झालेल्या व्यक्तीसारखी राजकीय आत्महत्या करायला उध्दव ठाकरे निघाले आहेत. आज शेवटची संधी दिली आहे धमकी समजा, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे.

उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व कुणीच मान्य करू शकत नाही. धनुष्यबाण गेलं, पक्ष गेला तरी सुधारत नाही. 100-100 कोटी अधिकाऱ्यांना मागितले. त्यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती आहे. त्यांच्यामधील लोकांवर कधी कारवाई होईल याची भीती आहे. फडणवीसांनी स्वभाव बदलला तर त्यांचे सगळं बाहेर निघेल. जनाची नाही तर मनाची ठेवा. फडणवीस यांनी 5 वर्ष मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांचे लाड पुरवले भावसारखं वागवलं. आणि आता उध्दव ठाकरे हे सगळं विसरले, असेही त्यांनी म्हणाले आहेत.

फडणवीस यांचा विधानसभेमधील 90 टक्के लोक आदर करतात. फडणवीस यांची टाचणीबरोबर देखील बरोबरी कुणी करू शकत नाही. अजित पवार, नाना पटोले कुणीही उध्दव ठाकरे यांचा समर्थन करू शकत नाही. आमच्या नेत्यांनी जर संस्कार सोडलं तर उध्दव ठाकरे यांना घराबाहेर निघणे कठीण होईल. पण, फडणवीस मात्र अस करू देत नाही. अडीच वर्षात त्यांनी नागपूर अन्याय केला, फडणवीस यांनी आपले संस्कार रक्तातून काढून टाकावे आणि आपल्या अधिकारांचा वापर करून कार्यवाही करावी, असे बावनकुळेंनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com