फडतूस गृहमंत्र्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही; रोशनी शिंदेंप्रकरणी उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

फडतूस गृहमंत्र्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही; रोशनी शिंदेंप्रकरणी उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

रोशनी शिंदेंची उध्दव ठाकरे यांनी भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

मुंबई : फेसबुक पोस्ट टाकल्याने ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे. या महिलेवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी उध्दव ठाकरे यांनी आज रोशनी शिंदे यांची भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर उध्दव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

फडतूस गृहमंत्र्यांना पदावर बसण्याचा अधिकार नाही; रोशनी शिंदेंप्रकरणी उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल
शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झाल्यानंतर रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; माझी चूक काय?

सर्वोच्च न्यायालयाने नपुंसक सरकार असं भाष्य केलं. ठाण्याची ओळख शिवसेनेची ठाण असं आहे. आणि ती ओळख पुसून गुंडांची ठाण अशी ओळख झाली आहे. महिलांची गँग होते हे पहिल्यांदाच मी ऐकतोय. त्यांनी काहीही करावं आणि आम्ही ऐकू असं होणार नाही. जर शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर मग यांना मुळापासून आम्ही उखडून टाकू, असा इशाराच उध्दव ठाकरेंनी दिला आहे.

याप्रकरणी तक्रार नोंदवलीच नाही. आयुक्तांना भेटायला गेलो तर कार्यालयात आयुक्तच नव्हते. आयुक्त सरकारचा घटक म्हणून काम करत आहेत का? जर आयुक्त लाचारी करत असतील त्यांना निलंबित करा. जरा जरी हिंमत असेल तर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, असे आवाहन त्यांनी दिले आहे.

उगाच यात्रा काढायच्या, पण ज्यांच्या विचाराने काढत आहेत त्यांच्या विचारांनी चला. आम्ही जलयात्रा काढतो नंतर तुमची. पीडित स्त्री मातृत्वासाठी उपचार घेत होती. जरी त्या गरोदर नसल्या तरी त्यांना मारायचं का? मारहाण समर्थानीय आहे का? मनाला हा प्रश्न विचारा, असेही त्यांनी म्हंटले आहे.

एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. केवळ उपमुख्यमंत्रीपद मिरवलं आणि चमकायचं हेच ते करत आहेत. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या घरात काही झालं की एसआयटी नेमायची. हे गुंड मुख्यमंत्री आहेत का? गुंड मंत्री असं एक खातं आता त्यांनी या सरकारमध्ये सुरु केलं पाहिजे. ताबडतोब गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही उध्दव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, रोशनी शिंदे यांनी मारहाणीनंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून मी माझे मत त्या ठिकाणी मांडले होते. मी माझ्या कमेंटमध्ये कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नीचा उल्लेख केला नसतानाही मला वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले होते. याप्रकरणी सखोल चौकशी करून तत्काळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करा, अशी त्यांनी मागणी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com