'त्या' वक्तव्यामुळे देशात राहुल गांधींबद्दल घृणा निर्माण; बावनकुळेंचे टीकास्त्र

'त्या' वक्तव्यामुळे देशात राहुल गांधींबद्दल घृणा निर्माण; बावनकुळेंचे टीकास्त्र

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यात नवा वाद उभा आहे. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याने राज्यात नवा वाद उभा आहे. यावर भाजप व शिंदे गटाकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे. परंतु, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगितले आहे. यादरम्यान भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकास्त्र सोडले आहे. देशाची मान राहुल गांधी यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

'त्या' वक्तव्यामुळे देशात राहुल गांधींबद्दल घृणा निर्माण; बावनकुळेंचे टीकास्त्र
सावरकरांच्या विधानावर राहुल गांधी ठाम! म्हणाले, हिंमत असेल तर...

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशाची मान राहुल गांधी यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे. सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे आणि काँग्रेस पार्टी त्यांचे समर्थन करत आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहीत असूनही ते जाणून बुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशाला त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं ते या वक्तव्याने गमावले आहे.

राजीव गांधींची जयंती-पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र, आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी कुठेही प्रतिमेला फुल वाहिलीत का, चार शब्द ते बोलले का? उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे. ते काँग्रेसला समर्पित झाले आहे. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील अशी आमची अपेक्षा होती. मात्र, आदित्य ठाकरेंना ते पाठवतात. फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा संविधान स्वीकारण्याएवढेच आता बाकी राहिले आहे, अशी जोरदार टीका बावनकुळेंनी केली आहे.

'त्या' वक्तव्यामुळे देशात राहुल गांधींबद्दल घृणा निर्माण; बावनकुळेंचे टीकास्त्र
राहुल गांधींच्या 'त्या' विधानावरून मनसे आक्रमक; राज ठाकरेंचे आदेश, मनसैनिकांनो उद्या...

तसेच, राहुल गांधींनी यात्रा रोखूनच दाखवा, असे आव्हान भाजपला दिले आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी भाष्य केले आहे. यात्रा थांबवायची असती तर पहिल्या दिवशी थांबवली असती आम्हाला त्याच्यात रस नाही. महाराष्ट्रात येऊन वीर सावरकरांविरोधात बोलणे आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधीना महाराष्ट्रात येण्याचा अधिकार राहिला नाही. राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे, असेही बावनकुळेंनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com