निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ

निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. याचा भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध करण्यात येत असून आंदोलने करत आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ
मनसेसैनिकांचा ताफा पोलिसांनी चिखलीत अडवला; नितीन सरदेसाईंना घेतले ताब्यात

भुजबळ म्हणाले की, 75 व्या अमृत महोत्सव साजरा होत असतांना नेहरू-गांधी घराण्याचा उल्लेख केला नाही. त्यांचं त्यांना करू द्या पब्लिक सब जानती है. पण, जे आज सावरकरांसाठी रस्त्यावर उतरले त्यांचं काय योगदान आहे. त्यांच्या मातृसंस्थेचं देखील काही योगदान नाही. निवडक सावरकर घेणं चुकीच आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

तसेच, राहुल गांधींनी एवढे मोठे प्रश्न असताना असा विषय घेणे चुकीच आहे. पण, त्यांना सांगणारा मी कोण, असे भुजबळांनी म्हंटले आहे.

निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ
...तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते; संजय राऊतांचा राहुल गांधींना इशारा

तर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये फुट पडण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, महाविकास आघाडी झाली त्यावेळेस प्रत्येकाने आपली आयडॉलॉजी जवळ ठेवली होती. शिवसेनेने कधी आमच्या सारख्या सर्वधर्म समभाव मान्य केला नाही. तसेच काँग्रेसने सुद्धा हिंदुत्व मान्य केलं नाही. भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी बनली होती. महाविकास आघाडी यांच्यात एक समान धागा आहे. भाजपला दूर ठेवणे हाच अजेंडा होता.

निवडक सावरकर घेणं चुकीचं : छगन भुजबळ
राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल
Lokshahi Marathi
www.lokshahi.com