Chhagan Bhujbal : गाव बंदी कोणी केली, जाळपोळ कोणी केली? त्यावेळी दोन समाजात वितुष्ट येईल असं वाटले नाही का?

Chhagan Bhujbal : गाव बंदी कोणी केली, जाळपोळ कोणी केली? त्यावेळी दोन समाजात वितुष्ट येईल असं वाटले नाही का?

नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published by  :
Siddhi Naringrekar

नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या, सर्वांची भूमिका आहे. ओबीसींचे आरक्षण कोर्टात सिद्ध झालं आहे. जरांगेंनी 14 सभा घेतल्या त्यामध्ये मला टार्गेट केलं. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं योग्य नाही. सभांमध्ये माझ्या नावाने शिव्या का घालत होते. सगळेच ओबीसीत येतील तर आरक्षण द्यायचे कोणाला? मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांची भूमिका.

जे आधीच कुणबी आहेत त्यांना समर्थन आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. नाशिकमध्ये अनेकजण कुणबी झाले आहेत. जरांगेंच्या नाशिकमधील सभेला माझ्या शुभेच्छा. जाळपोळीच्या घटनेनंतर मला भाष्य करावे लागले. पण जाळपोळ करणारे कोण? यावर जरांगेंनी बोलावं. सगळेच ओबीसीत आले तर कुणालाच काही मिळणार नाही. सामाजित सलोखा राहिलाच पाहिजे. ज्यांचं चुकलं त्यांना बोललं पाहिजे. राज्यात तणाव कुणालाही नको आहे. असभ्य भाषेत बोलणाऱ्यांना खडेबोसल ऐकवा. त्यांना कायद्याचे कोणतेही बंधन नाही. त्यांच्या रात्री बेरात्री सभा. असे छगन भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com