Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

मुख्यमंत्र्यांनी दिली इंदू मिल स्मारकाबद्दल महत्वाची माहिती; म्हणाले, निर्धारित वेळेपूर्वी काम...

जगातील भव्यदिव्य स्मारक व्हावं ही आमची इच्छा आहे. साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा साकारला जाणार आहे.बाकी कामं प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्र्यांची दिली माहिती

आज राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे स्मारकाचे काम वेगाने ही काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक डेडलाईन आधीच पूर्ण होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

Eknath Shinde
संजय राऊतांच्या जामीनाविरोधात ईडीची सुधारित याचिका दाखल, 5 नोव्हेंबरला होणार सुनावणी

मुख्यमंत्र्यांनी स्मारकाबद्दल दिली ही माहिती?

इंदू मिलची पाहणी केल्यानंतर स्मारकाबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाबासाहेबांचं भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावं, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. भेट देऊन पाहणी केली. कामाचा आढावा घेतला आहे. जगातील भव्यदिव्य स्मारक व्हावं ही आमची इच्छा आहे. साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा साकारला जाणार आहे.बाकी कामं प्रगतीपथावर आहे. त्याचा बेस तयार आहे. हे स्मारक व्हावं याची चर्चा झाली. सर्वसमावेशक समिती ही गाझियाबादमधला पुतळा पाहिला. त्याला अंतिम मंजुरी दिल्यावर तातडीने कार्यवाही होईल. कुठे काही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

जवळपास ५० टक्क्याहून अधिक काम पूर्ण झालं. लेक्चर हॉल, ऑडिटोरियम वाहनतळ तयार झाला आहे. ७० टक्के हरीत पट्टा असणार आहे. मार्च २०२४ ची तारीख आहे. पण त्यापूर्वी स्मारक व्हावे हा प्रयत्न आहे. बाबासाहेब सर्वांचे होते. सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहोत, सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी इंदी मिलला भेट दिल्याचं सांगितलं. ५० टक्के काम झालं आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल. दिलेल्या निर्धारित वेळेपूर्वी काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com