Maratha Reservation : आज मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंची भेट घेणार

Maratha Reservation : आज मुख्यमंत्री शिंदे मनोज जरांगेंची भेट घेणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे हे
Published by  :
Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या 17 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्याबरोबर यावे.

सरकारने आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावे. असे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री शिंदे हे मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, उदय सामंत. विखे पाटील देखिल जाणार आहेत. मध्यरात्रीच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज जरांगेंची भेट घेणार.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com