उर्फीच्या अडचणी वाढल्या! चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

उर्फीच्या अडचणी वाढल्या! चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा; चित्रा वाघ यांची मागणी

विचित्र फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणार उर्फी जावेद आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण याच फॅशनमुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आता उर्फी जावेदवर भडकल्या आहेत. आज थेट त्यांनी उर्फीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेत पत्र दिले आहे.

उर्फीच्या अडचणी वाढल्या! चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
...तर शिवसेना एकसंध होण्यास वेळ लागणार नाही; केसरकरांचे सूचक वक्तव्य

उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनली आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.

तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीली आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

उर्फीच्या अडचणी वाढल्या! चित्रा वाघ यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार
माझ्या राजीनाम्यासाठी विरोधक 25 वर्षांपासून देव पाण्यात ठेवून बसलेत : सत्तार

दरम्यान, याआधीही उर्फी जावेदवर ट्विटरवरुन हल्लाबोल केला होता. अरे..हे काय चाललयं मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला पोलिसांकडे कलमे आहेत की नाही. तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही बया अजून विकृती पसरवतीये, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com