राजकारण
Video : भिडेंवरून सभागृहात फडणवीस- चव्हाणांमध्ये शाब्दिक चकमक
संभाजी भिडे यांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुजी असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला आहे.
मुंबई : संभाजी भिडे यांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुजी असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांना गुरुजी का म्हणता असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. संभाजी भिडे यांना गुरुजी म्हणण्यासारखं त्यांनी काय केलंय, असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला.
संभाजी भिडे हे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सोन्याचं सिंहासन तयार करण्याच्या नावाखाली भिडे सोनं गोळा करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी करतात तसाच पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख लोकं बाबा म्हणून करतात, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी चव्हाणांना दिलं आहे. यामुळे सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला होता.