कांदा उत्पादक आणि अब्दुल सत्तार यांच्यात खडाजंगी; माझ्या आयुष्यात...

कांदा उत्पादक आणि अब्दुल सत्तार यांच्यात खडाजंगी; माझ्या आयुष्यात...

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांची कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत बैठक झाली आहे.

पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलन करत आहेत. तर, विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. या पार्श्वभूमीवर पणनमंत्री अब्दुल सत्तार यांची कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. यावेळी कांदा उत्पादक आणि अब्दुल सत्तार यांच्यात खडाजंगी झाली. माझ्या आयुष्यात 2400 चा भाव मी ऐकलं नाही, असे अब्दुल सत्तार म्हंटले आहे.

कांदा उत्पादक आणि अब्दुल सत्तार यांच्यात खडाजंगी; माझ्या आयुष्यात...
मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण...; उध्दव ठाकरेंचे मोठे विधान

टॅक्स लावल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता पण आता आवक सुरू झाली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवावी लागतील अशी मागणी आहे. उत्पादकांच्या मनात ज्या भावना होत्या, त्यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्र सरकारला या शेतकऱ्यांच्या भावना आम्ही कळवू. २४०० रुपये भाव आपण पाहतोय. जे निर्यातदार आहेत त्यांचे मत देखील आम्ही आज घेतले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत, असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

कांदा, बटाटा, टोमॅटो याच्यासाठी भविष्यात योजना आणणार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती करणार आहे. शेतकऱ्यांनी भाव जे आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केली. कांदा उत्पादक, व्यापारी यांचे ऐकून घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत. २ लाख टन आपण खरेदी करत आहोत. शेतकऱ्यांना असं वाटत आहे की पुढे भाव वाढतील पण आम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. राज्यात आणि देशात सत्ता एका विचार धारांची आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. तर, साखर निर्यात संदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहोत, असेही सत्तार म्हणाले आहे.

दरम्यान, 16 आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाने सहा हजार पानी उत्तर दिले आहे. याबाबत बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, ६००० पाने खूप मोठे असतात. शिवसेना आम्हाला नाव मिळाले. चिन्ह मिळाले हे आम्हाला माहिती आहे. जशी परिस्थिती निर्माण होईल तसे आम्ही उत्तरं देऊ. मी काय उत्तरे देऊ अपात्र प्रकरणी माझेच नाव तिसरे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com