शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पेटला; वादाचे रुपांतर हाणामारीत, सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पेटला; वादाचे रुपांतर हाणामारीत, सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 5 जण अटकेत

मुंबई : शिवसेना-शिंदे गटामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर आज मध्यरात्री दोन्ही गटामध्ये जोरदार वाद झाला. याचे रुपांतर आज माराहीणीत झाले आहे. दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट समोरासमोर आले. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, सरवणकरांनी आरोप फेटाळले आहेत.

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी जंक्शनजवळ शिवसेनेकडून गणेश भक्तांच्या स्वागतासाठी स्टेज उभारला होता. मात्र, याच्याच शेजारी शिंदे गटानेही आपला स्टेज उभा केला होता. यावरून शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्याव म्याव म्हणत शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले. यामुळे दोन्ही गटात शाब्दिक वाद झाला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता.

यानंतर महेश सावंतांनी शिवीगाळ केल्याची आणि अंगावर धावून गेल्याची तक्रार सावंतांच्या साथीदारांनीही मारहाण तक्रार केली होती. शिंदे गटाच्या तक्रारीनंतर 25 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर, सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. पोलीस या आरोपात किती तथ्य आहे हे पडताळणार आहेत. शिवाय पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज काढायला सुरुवात केलेली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com