Clash between Shinde group & Thackeray group in Thane
Clash between Shinde group & Thackeray group in Thane Team Lokshahi

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदेगट-ठाकरे गटात हाणामारी

सदर प्रकार हा ठाण्यातील किसन नगर येथे काल संध्याकाळी 9 च्या सुमारास घडला असल्याचं वृत्त आहे.

सदर प्रकार हा ठाण्यातील किसन नगर येथे काल संध्याकाळी 9 च्या सुमारास घडला असल्याचं वृत्त आहे. किसन नगर येथे ठाकरे-शिंदे गट आमने सामने आले होते. ठाकरे गटाकडून मेळावा घेत असतांना शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर यांच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण. योगेश जाणकर हे बाळासाबेबांची शिवसेना (शिंदेगट) या पक्षाचे माजी नगरसेवक आहेत.

Clash between Shinde group & Thackeray group in Thane
"मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय..." आव्हाडांच्या ट्वीटनं राजकीय क्षेत्रात खळबळ

तर यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे देखील होते उपस्थित, ठाण्यात ठाकरे शिंदे गटात तणावाचं वातावरण, मारहाणीत जखमी झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलं आहे. दरम्यान, या विषयावर योगेश जाणकर व राजन विचारे यांच्याशी बातचीत केली असता एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com