CM Eknath ShindeTeam Lokshahi
राजकारण
'निष्ठावंतांचा एल्गार' मुख्यमंत्र्यांच्या खेडमधील सभेचा टिझर जारी
ज्या गोळीबार मैदानात ठाकरे यांनी सभा घेतली त्याच गोळीबार मैदानात शिंदेंची सभा होणार आहे.
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधत जोरदार टीका केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी त्याच ठिकाणी शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात 19 मार्च रोजी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज त्याच सभेचा टिझर आमदार योगेश कदम यांनी जारी केला आहे.
शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी या सभेचा टिझर जारी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा टिझर प्रदर्शित केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! असे लिहित त्या सभेबाबत माहिती दिली आहे.