Eknath Shinde Meet PM Narendra Modi
Eknath Shinde Meet PM Narendra ModiTeam Lokshahi

आज मोदी-शिंदे भेट होण्याची शक्यता; वेदांता प्रकरणावर शिंदे पंतप्रधानांशी चर्चा करणार का?

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यानंतर शिंदे सरकारच्या हालचालींना वेग
Published by :
Vikrant Shinde

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे शिवसेना विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. नुकतंच राज्यातून वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) हा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून राज्यात विरोधकांकडून निदर्शनं व निषेध व्यक्त केला जात आहे. सरकारने वेदांता पेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणण्याची घोषणा केल्यानंतरही टीका व विरोध थांबत नसल्यानं आता सरकार या विषयी काय करणार हे पाहणं गरजेचं आहे.

Eknath Shinde Meet PM Narendra Modi
Saamna Editorial: सामनामधून भाजपवर घणाघात; 'खोक्यांच्या वसुलीमुळे गुंतवणूकदारांची पळापळ'

शिंदे कालपासून दिल्लीत:

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासून दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या हातून वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यानंतर राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दिल्लीला गेले असून तिथे ते केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्याच्या उद्दिष्ट्याने गेले असून. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे.

भेटीदरम्यान काय चर्चा होण्याची शक्यता?

मुख्यमंत्री व पंतप्रधान यांची भाट आज दुपारी दीड वाजता होण्याची शक्यता आहे. यावेळी, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. तसंच आणखीही काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com