Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले...

Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले...

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे.

महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल लागला आहे. राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींची निवडणुक झाली. 5 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आज मतमोजणी पार पडत आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायतीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात कौल मिळाला आहे. मी मतदारांना धन्यवाद करतो. महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्पाला आम्ही चालना देण्याचे काम केलं.

सर्वांना न्याय देण्याचा काम आमच्या सरकारने केलं. 'शासन आपल्या दारी' खरोखर लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले म्हणून हा निकाल आपण पाहतोय. आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आणखी काम करू, आणखी उद्योग आणू. असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com