माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माझ्यामुळे कुणाचा कंबरेचा तर कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिंदे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
Published by  :
Siddhi Naringrekar

शिंदे गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात अल्पसंख्याक समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, आधीचं सरकारही तुम्ही पाहिले. सर्व घरात बसले होते. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना बाहेर काढलं आहे. जे विषय सोडवायचे ते पटकन सोडवणार आहे. जे धोरणात्मक निर्णय आहेत. तेही अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवणार आहे. सर्वजण फिरत आहेत. जागोजागी जात आहेत. कुणाचा कंबरेचा पट्टा निघाला, कुणाचा गळ्याचा पट्टा निघाला. सर्व निघालं. असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com