ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे एक पक्ष...; मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे एक पक्ष...; मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप

पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान विरोधकांनी सभागृगात गोंधळ घालण्यास सुरुवात केली असता ए गप्प बसा रे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फटकारले. व कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अकाउंटवरुन ट्वीट करणारी व्यक्ती सापडली असल्याची माहिती त्यांनी दिली.

ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे एक पक्ष...; मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन अजित पवार आक्रमक; विधानसभा अध्यक्षांनी मध्येच थांबवले

एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार यांचा मुद्दा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. पण, पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली. त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. आम्ही त्यावेळी ठोस भूमिका घेतली. आमच्या लोकांना, गाडयांना अडवले जात असल्याचे त्यांना सांगितले. यावर आमच्याकडूनही प्रतिक्रिया उमटू शकतात, असेही त्यांना सांगितले.

अमित शहा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही सूचना केल्या आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याचे भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. त्यांनी स्वत: बाहेर येऊन केंद्र सरकारची भूमिका मांडली. त्यांचे स्पष्टपणे भूमिका घेतल्याने अभिनंदन करायला हवे होते, असे शिंदेंनी म्हंटले आहे. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. सीमावासियांच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. बाळासाहेबांची हीच भूमिका होती, असेही त्यांनी म्हंटले आहे.

ते ट्वीट बोम्मईंचं नाही, त्यामागे एक पक्ष...; मुख्यमंत्री शिंदेंचा आरोप
'मराठा क्रांती मोर्चा'चा व्हिडीओ शेअर केला? संजय राऊत म्हणाले...

यापूर्वीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी धर्मादाय निधीचे पैसे बंद केले होते. आम्ही चार महिन्यात बंद केलेल्या योजना सुरु केल्या. सीमावासी लोक जे ठराव करतात त्यामागे कोणते पक्ष असतात याची माहिती पोलिसांकडून आली आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समोरासमोर चर्चेदरम्यान तुम्ही ट्वीट करत असून हे चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्यावर त्यांनी हे आमचे ट्वीट नाही, असे त्यांनी म्हंटले होते. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे याचीही माहिती मिळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com