Uddhav Thackeray resignation
Uddhav Thackeray resignationTeam lokshahi

हीच तत्परता जर राज्यपालांनी 12 आमदारांबाबत दाखवली असती तर...

चांगली काम सुरू असली की त्याला दृष्ट लागतेचं; उद्धव ठाकरे
Published by :
Shubham Tate

Uddhav Thackeray Eknath Shinde : बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यामुळे उद्या सकाळी 11 वाजता विश्वासमत चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ठाकरे सरकारचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच रात्री 9:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते काय म्हणाले वाचा...(CM Uddhav Thackeray to interact with people at 9:30 pm, announce resignation)

Uddhav Thackeray resignation
आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कधीच होऊ देणार नाही; इम्तियाज जलील संतप्त

सरकार म्हणून काय केलं यावर बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, पीक विमा बीड पॅटर्न राबवला तसेच, शिवसेनाप्रमुखांनी जे नाव औरंगाबाद जिल्ह्याला ठेवलं, ते संभाजीनगर नाव दिलं. विश्वासमत चाचणी करण्याचा आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही हा निर्णय दिला आहे. विरोधी पक्षांनी पत्र दिल्यानंतर तातडीने राज्यपालांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. पण हीच तत्परता जर राज्यपालांनी 12 आमदारांबाबत दाखवली असती, अजूनही केलीत, तर तुमच्याबद्दल आदर वाढेल. जे दगा देणार म्हणत होते, त्यांनी दगा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला.

Uddhav Thackeray resignation
आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर कधीच होऊ देणार नाही; इम्तियाज जलील संतप्त

सर्वोच्च न्यायालयाने विश्वसदर्शक ठरावास स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यानंतर पाच मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. आणि संवाद साधत राजीनामा दिला आहे. ॉ

सोनिया गांधी, शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील सहकाऱ्यांचे आभार, या ठरावाच्या वेळेला मी, आदित्य, देसाई आणि परब हे चारच शिवसेनेचे मंत्री, एका अक्षरानेही विरोध केला नाही, तातडीने मंजुरी दिली, ज्यांनी हे करायला पाहिजे होते, ते नामानिराळे, ज्यांचा विरोध भासवला, ते सोबत, रिक्षावाले, हातभट्टी वाले यांना नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मंत्री, ज्यांना मोठं केलं, ज्यांना सत्ता दिली, ती लोकं नाराज झाली. असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com